एक तासाच्या प्रवासात,
खूप काही आज घडलं.!
बाजुला बसलेल्या मुलीच,
जीव माझ्यावर जडलं.!
वही समोर ठेवून मनातल्या
मनात कविता वाचत होतो.!
चुकलेल्या ठिकाणी थोडी,
मी दुरूस्ती करीत होतो.!
मला माहितीच नव्हत ती,
माझ्या कविता वाचत आहे.!
मला प्रश्न पडला का बरं,
हि माझ्याकडे पाहत आहे.!
थोडीशी लाजून हासून बोलली,
खूप छान सुंदर आहेत कविता.!
मला लगेच नबंर दिला म्हणाली,
ह्या वर रोज पाठवा सर कविता.!
माझ्या कडेच पाहून आता,
प्रत्येक क्षणाला हसत होती.!
मला वाटतच होत ती मला,
तिच्या मनात भरवत होती.!
दुसऱ्याच क्षणाला ती अचाणक,
माझ्या डोळ्यात ती पाहिली.!
माझा हात तिच्या हातात घेवून
तुमच्यावर जीव जडलाय बोलली.!
मी तर पार दचकलोच म्हणल
प्रेम अस कस होऊ हो शकत.!
डोळ्यात पाहून मला म्हणाली
एका नजरेतून प्रेम होत असत.!
घाबरलोच होतो मी खूपच
प्रेमाणे पाहत होती माझ्याकडे.!
म्हणल ओ मॅडम येवढं प्रेमाणे,
पाहू नका हो माझ्याकडे.!
मला भिती होती फक्त आईची,
आई माझ्या मागेच बसली होती.!
_खरचं सांगतोय राव मी , _
ती माझ्या मागे लागली होती.!
जस जस गाव माझं थोड,
_जवळ जवळ येत होत.! _
तिला बोलत बोलत माझ्या
मनात तिच मन भरत होत.!
ती मुलगी माझ्या गावची,
माझ्या कॉलेजचीच होती.!
आता मग विरहा नंतर आजून
एक प्रेमाची संधी भेटली होती.!
आता रोज रोज सुरू असत,
बोलण बसण भेटण फिरण.!
दूर असेल तर आठवणीत,
मी तिच्या ती माझ्या जगण.!
-----------बालाजी लखने(गुरू)-----------
उदगीर जिल्हा लातूर
टिप- माझा आणि कवितेचा काही संबंध नाही बरं..😄