छिन्न भिन्न सारे दरवाजे
अमोघ खिडक्या बंदिस्त असलेल्या
तरीही नसे कवडसे चांदण्याचे
नसे किरण एकही आशेचा
एक एक प्रहर जणू सात जन्माचा
एक एक जन्म जणू प्रहार वज्राचा
एकच वार भासे सहस्त्रसारखा
लागे मनावर अन करी संहार भावनांचा
बंदिस्त झाले मन, आखडला गेला आत्मा
जणू बंधन घालावे काळ्या जादूवर कुण्या बुवाने
आयुष्य कोंडावे बंद बाटलीत जणू
मी रडावे अन जगाने त्यावर हसावे
पेटून उठून पुन्हा, भावनांचा कहर करेन
भावनाहीन श्वापदांचा करेन संहार
संपवेन स्वतःलाही जर झालोच भावनाहीन
पण भावनेवरचा अन्याय नाही सहन करणार