आधीच विचार करा

in motivation •  2 years ago 

भूलथापांना बळी पडून कोठेही आपले पैसे गुंतवू नका, आधीच विचार करा

मैत्रेय:धनादेश Bounce, मालकाला अटक
पियरलेस:पत्ताच नाही
कल्पवृक्ष: अचानक बंद पडलं ! ४०० कोटी बुडले
Venus life :मालिक तुरुंगात लौक रस्त्यावर, सगळे बुडाले
Per Day Cash : नुसत्या थापा
संचयनी :लोकांचे पैसे बुडाले
KBC:मालक पैसे घेऊन सिंगापूरला फरार
रायसोनी मल्टीस्टेट :१२ संचालक तुरुंगात सोसायटी बंद खातेदार बुडाले.तशा अनेक मल्टीस्टेट सोसायटी बुडण्याच्या मार्गावर
Imu egg yojna: पैसे घेऊन मालक फरार
Japan Life गादी :पैसे गेले अन् गादीवर झोपच नाही लागली
पर्लस् :भांगू पळाला. एजंट लपून बसले
Swadeshi :माणसे नाही भेटली
RCM : दुकानं बंद पडली
Netsurf :होते काही तरी
Noni :बळजबरी लोकांना आजारी म्हणायचे
Pan Card Clubs : चेक बाऊन्स ? मालक स्वर्गवासी गेले. एकुण एक गुंतवणूकदार बुडाले.
समृद्ध जीवन :FRAUD मुळे मालकाला अटक! हजारो करोड बुडाले
सहारा investment : मालक ४ वर्षे तुरुंगात. लोक स्मशानात.
सिट्रस- व्टिंकल : गोयेंका गायब, कंपन्याची नावे बदलून लुटालुट सुरुच आता बंद पडले, पैसे गेले सर्व गेले इत्यादी इत्यादी
मूर्ख बनवणारे हजारो आपणच,
मूर्ख बनणारे लाखो आपणच
कमी श्रमात अधिक पैसे कमविण्याचा
शॉर्ट-कट मार्ग हवाय ना सगळ्यांना,
म्हणुन वेगवेगळ्या नावाने दरवर्षी येणाऱ्या मार्केटींग कंपन्या मल्टीस्टेट सोसायट्या यांची खुप मोठी यादी आहे मित्रांनो

ही सर्व धोखाधडी चालू असते, चालूच राहणार नवीन-नवीन नावाने,
नवीन बनावटचेहऱ्याने.
पुर्वीच्या प्लांटेशन कंपन्या प्रमाणे आता कॉईनच्या नावे हजारो कंपन्या आल्या आहेत. रोज कोणीतरी कॉईन काढतो बघता बघता ४८ तासात त्या कॉईनचा दर डबल होतो. अवघ्या २ दिवसात झाले तुमचे पैसै डबल.

बिचाऱ्या सरकारी बँका 11 वर्षे घेतात दुप्पट द्यायला पोस्ट विभाग 12 वर्षे घेते. इथे मात्र केवळ 2/3 वर्षात तुमचे पैसै दुप्पट. अरे थोडं तरी डोकं चालवा. आपला घामाचा पैसा कुठेही गुंतवून आपली फसवणूक करुन घेऊ नका.

कारण प्रत्यक्षात काहीच नाही आभास फक्त.
व्हर्चुअल करंन्सी, डिजिटल पेमेंट, मायनींग, मोठे उच्चार, केवळ मोठी नावं, मात्र शुध्द फसवणूक.
माणसाची स्वत:ची लालची वृत्ती व असलेला हव्यास त्याला स्वत:लाच फसवते
आपल्या लोकांचे अज्ञान व आर्थिक अंधश्रध्दा याला कारणीभूत असली तरीसुद्धा आपल्याच देशबांधवांना फसवणारे महाठक याला जबाबदार आहेत

बऱ्याच वेळा फसवणारे लोक आपल्यातलेच, मित्र-मैत्रिणी, गावातलेच, नात्यातलेच, ओळखीचे
किंवा सलगी करून परिचय करून घेणारे असतात. आपल्याकडील पैसा लुबाडून नेला जाईपर्यंत, ते आपल्याला परके वाटतच नाहीत, शंका येत नाही आणि तिथेच आपली फसगत झालेली असते
आपल्या पैशांची काळजी घ्यावी.आपल्या कुटुंबासाठी कमविलेले मेहनतीचे पैसे कुणा फसव्यामाणसाकडे जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी
नकार द्यायला घाबरू नये.

कुठलीही कंपनी असो, त्या कंपनीच्या एक्झिक्युटिव्हच्या सुटाबुटातल्या मँनेजरच्या भूल- थापांना, लबाड भाषेला, बडेजाव-झगमगाटाला, फाईव्ह स्टार मधल्या मिटिंगला व अत्यंत खोट्या आश्वासनांना बळी पडू नये.

शेवटची महत्वाची एक गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवा.जो कुणी बिना मेहनत शिवाय पैसे देतो म्हणतो,किंवा मिळतात म्हणतो., तेथे नक्कीच धोका आहे हे ओळखा
बिगर श्रम केल्याशिवाय या जगात काही मिळत नाही तेव्हा भ्रमात न राहता आपल्या मेहनतीचा पैसा लुटला जाणार नाही ते बघा, समोरचा धोका ओळखा व अशा लोकांपासून व कंपन्यां पासून लगेच सावध व्हा...

Authors get paid when people like you upvote their post.
If you enjoyed what you read here, create your account today and start earning FREE STEEM!
Sort Order:  
Loading...