महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत नाव पटकावलं आहे. प्रश्नम या संस्थेनं देशातील १३ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीबाबत मतदारांकडे सर्वेक्षण केलं होतं. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून चांगली कामगिरी केल्याचं अनेकांनी नमूद केलं.
चांगली कामगिरी केल्य़ामुळे आम्ही पुन्हा त्यांना मतदान करू असं मत सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ४९ टक्के मतदारांनी नोंदवलं आहे. देशातील मुख्यमंत्र्यांच्या सर्वेक्षणात १३ राज्यांमधील सुमारे १७ हजार ५०० मतदारांना याबाबत आपली मतं विचारण्यात आली आहेत.
प्रश्नमनं भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये घेतलेल्या सर्वेचे रेटिंग जाहीर केले आहे. पहिल्या फेरीत १३ राज्यांमध्ये बिहार, गोवा, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड अशी जवळपास ६७ टक्के लोकसंख्या असणारी राज्ये आहेत.
अलीकडेच पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसाम या निवडणुका घेतल्या गेलेल्या राज्यांची जाणीवपूर्वक निवड केली नाही. कारण संबंधित मुख्यमंत्री स्थिर होत आहेत. या राज्यात कोणतेही पॅनेल नसल्यामुळे आंध्र प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली आणि हिमाचल प्रदेशात सध्या सर्वेक्षण करण्यात आलेले नाही. या राज्यांचा पुढील टप्प्यात समावेश करण्यात येईल.
To read more, visit: www.mumbailive.com
You've got a free upvote from witness fuli.
Peace & Love!
Downvoting a post can decrease pending rewards and make it less visible. Common reasons:
Submit