राज्यात शुक्रवारी ६ हजार ६८६ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. तर ५ हजार ८६१ रुग्ण बरे झाले आहेत. तसंच १५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्याचा मृत्यूदर आता २.११ टक्क्यांवर पोहोचला आहे. याचबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६१ लाख ८० हजार ८७१ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८५ टक्के इतके झाले आहे.
राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ६३ हजार ००४ आहे. पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक १४ हजार ५२२ आहे. त्या खालोखाल सांगलीत एकूण ६ हजार ६६९ इतके रुग्ण उपचार घेत आहेत. तर, साताऱ्यात ही संख्या ७ हजार ०६८ इतकी आहे. या खालोखाल अहमदनगरमध्ये एकूण ५ हजार ५२४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ठाणे जिल्ह्यात ६ हजार ३५९ सक्रिय रुग्ण आहेत. तर सोलापुरात ४ हजार ८१० इतके रुग्ण आहेत.
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ०५ लाख ४५ हजार ५५२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३ लाख ८२ हजार ०७६ (१२.६३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३ लाख ७० हजार ८९० व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, २ हजार ६७६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील
To read more, visit: www.mumbailive.com