पूरग्रस्तांना आधार देण्यासाठी राज्य सरकारने नुकसानभरपाई जाहीर केली आहे. यानुसार, मृतांच्या वारशांना पाच लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे. तर इतर सर्व पूरग्रस्तांना रोख दहा हजार आणि पाच हजारांचे धान्य पुरवण्यात येणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त भागात पाहणी दौरा केला. या दौऱ्यानंतर त्यांनी स्थानिक प्रशासनासोबत घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठक झाल्यानंतर मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
वडेट्टीवार यांनी सांगितलं की, प्रति कुटुंब दहा हजार रुपयांची मदत पूरग्रस्तांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. पुरामध्ये जी घरं गेली किंवा घरात पुराचं पाणी शिरलं आहे, त्या सगळ्या ठिकाणी सर्व कुटुंबास दहा हजार रुपये नगदी रुपाने व पाच हजार धान्य रुपाने ही मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.
To read more, visit: www.mumbailive.com
You've got a free upvote from witness fuli.
Peace & Love!
Downvoting a post can decrease pending rewards and make it less visible. Common reasons:
Submit