१०९ रेल्वे स्थानकांवर मिळणार ऑफलाईन लोकल पास

in mumbai-live •  3 years ago 

दुसरा डोस घेतलेल्यांना १५ ऑगस्टपासून लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. दुसरा डोस घेतलेल्यांसाठी पालिकेने आराखडा तयार केला आहे. मुंबई व एमएमआर क्षेत्रातील १०९ स्थानकांवर ३५८ मदत केंद्र उभारण्यात आली आहेत. या मदत केंद्रांवर पालिकेचे कर्मचारी तैनात करण्यात येणार आहे. सकाळी ७ ते रात्री ११ या दोन शिफ्टमध्ये कार्यरत राहणार आहेत.

कोविड लसीकरणाचा दुसरा डोस घेऊन १४ दिवस पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र व छायाचित्र ओळखपत्र पुरावा आणणे बंधनकारक आहे. दुसरा डोस घेतलेल्यांना फक्त पास मिळणार असून तिकीट मिळणार नसल्याने दुसरा डोस घेतलेल्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दुसरा डोस घेतलेल्यांना १५ ऑगस्टपासून लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. रेल्वे स्थानकांवर ऑफलाइन पास घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. त्यासाठी अवघ्या १० सेकंदांचा अवधी लागणार आहे. त्यासाठी मुंबईसह महानगर प्रदेशातील १०९ लोकल स्थानकांवर ऑफलाइन पडताळणी सुविधा उपलब्ध ठेवण्यात येणार आहे. पश्चिम, मध्य, हार्बर मार्गावरील स्थानकांवरील तिकीट खिडक्यांवर मुंबई पालिकेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रत्येकी एक कर्मचारी दोन पाळ्यांमध्ये नेमण्यात आले आहेत.

तिकीट खिडक्यांवर कर्मचार्‍यांकडून कोविन अॅपवर प्रमाणपत्राची वैधता, छायाचित्र ओळखपत्र पुरावाही तपासतील. पडताळणीमध्ये दोन्ही कागदपत्रे वैध असल्याचे निश्चित झाल्यावर कोरोना प्रमाणपत्रासह छायाचित्र ओळख पुराव्यांच्या प्रतीवर शिक्का दिला जाईल. हे अंतिम प्रमाणपत्र तिकीट खिडक्यांवर दाखविल्यानंतर रेल्वे पास देण्यात येईल.

To read more, visit: www.mumbailive.com

Authors get paid when people like you upvote their post.
If you enjoyed what you read here, create your account today and start earning FREE STEEM!