मागील आठवड्यापासून पावसानं मुंबईसह आसपासच्या परिसरात तुफान बॅटींग केली. मुसळधार पावसामुळं सर्वत्र पुरस्थिती निर्माण झाली असून, जनजीवन विस्कळीत झाली. दरम्यान, यापुर्वीच हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. अशातच आता शुक्रवारीदेखील कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडील माहितीनुसार, शुक्रवारीदेखील कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागानं दिलेल्या माहितीनुसार, २३ जुलै रोजी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर नाशिक, औरंगाबाद, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला आणि नागपूर या जिल्ह्यांत सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे.
२४ जुलै रोजी पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर मुंबई, ठाणे, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे.
२५ जुलै रोजी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. मुंबई, पालघर, ठाणे, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांत सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे.
To read more, visit: www.mumbailive.com