राज्यात सध्या डेंग्यूचे १ हजारापेक्षा अधिक रुग्ण असून, गेल्या ४ महिन्यांत ५ रुग्ण दगावले आहेत. मुंबईत डेंग्यूचे ५७ रुग्ण आढळले आहेत. पुण्यात ३६ रुग्ण असून, हजारापेक्षा जास्त संशयित आहेत. विदर्भात ३६८ रुग्ण आढळले असून, ३ रुग्णांना जीव गमवावा लागला आहे.
नागपूरमध्ये १९४, यवतमाळमध्ये ६७, वर्धा येथे ४९, अमरावतीत २५०, चंद्रपूरमध्ये २२, बुलडाणा येथे ७, भंडाऱ्यात ४ रुग्ण डेंग्यूचे आढळले आहेत. मराठवाड्यात डेंग्यूचे ११० रुग्ण गेल्या काही महिन्यांत आढळले आहेत. यातील सर्वाधिक ६८ रुग्ण नांदेड जिल्ह्यात आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात २१, औरंगाबाद जिल्ह्यात १३, परभणी जिल्ह्यात ४ तर बीड आणि लातूर जिल्ह्यांत प्रत्येकी २ रुग्ण आढळले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात १२४, सांगलीत १२ तर सातारा येथे ९२ डेंग्यू रुग्णांची नोंद झाली आहे. रत्नागिरीमध्ये २ तर सिंधुदुर्गमध्ये ६९ रुग्णांची नोंद झाली असून, ठाण्यात १७ रुग्णांची नोंद झाली असून, २ रुग्ण दगावले आहेत. नाशिकमध्ये डेंग्यूबरोबरच चिकनगुनियाचेही ११७ रुग्ण आढळून आले आहेत. जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत डेंग्यूचे तीन रुग्ण आढळून आले आहेत. ही तिन्ही बालके आहेत.
To read more, visit: www.mumbailive.com