लठ्ठपणा माणसाला आतून कमजोर बनवतो. आपण तंदुरुस्त असावे असे अनेकांना वाटत असते पण तंदुरुस्त होण्यासाठी जी मेहनत करावी लागते ती त्यांना करायची नसते. पण कधी कधी आयुष्यातला एक मोठा धक्का माणसाचे संपूर्ण आयुष्यच बदलू शकतो. ब्रिटनमधील एका व्यक्तीसोबत असंच काहीस घडलं जेव्हा त्याच्या आयुष्यातील एका समस्येने त्याला वजन कमी करण्याची प्रेरणा दिली.
54 वर्षीय रिचर्ड गोल्डन हे आधी 95 किलोचे होते. गेल्या वर्षी जून महिन्यात त्यांना लठ्ठपणामुळे हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. तेव्हापासून रिचर्डने ठरवले आहे की ते त्याच्या आरोग्याची आणि वजनाची काळजी घेतील आणि वजन कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. अवघ्या एका वर्षात त्यांनी आपले वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि आता त्याचे शरीर चक्क 25 वर्षाच्या तरुणासारखे दिसते आहे.
5 मुलांचे वडील असलेल्या रिचर्ड यांनी सांगितले की, पूर्वी ते इतके लठ्ठ होते की त्याच्या लग्नातली अंगठी त्यांना होत नव्हती. ऑफिसमधून आल्यानंतर ते रोज ब्रँडी प्यायचे, पण वजन कमी करण्यासाठी त्यांनी दारू पिणे पूर्णपणे बंद केली. त्यांनी स्वत:साठी एक प्रशिक्षक नेमला आणि त्याच्या मदतीने व्यायाम सुरू केला.
रिचर्डने सांगितले की, जेव्हा त्याने व्यायामाला सुरुवात केली तेव्हा पुन्हा हृदयविकाराच्या झटक्यापासून स्वतःला वाचवणे हा त्याचा एकमेव उद्देश होता. पण या साऱ्या प्रक्रियेत त्यांनी स्वत:मध्ये असा बदल केला की, आता ते प्रेरणादायी ठरत आहेत. 95 वरून वजन कमी करून त्याने आपले वजन 76 वर आणले. दोन मुलांचे आजोबा रिचर्ड यांनी आता त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला प्रेरित केले आहे आणि प्रत्येकाला जिम मेंबरशिप मिळवून दिली आहे. काम संपवून ते थेट जिममध्ये जातात त्यांच्या पत्नीलाही हा बदल पाहून खूप आनंद झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.